Pune – पीएमपीएल बस चालकाला मारहाण ; तिघांना अटक

एमपीसी न्यूज- पीएमपीएल बस चालकाला मारहाण केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री पावणेनऊच्या सुमारास कोंढवा येथे घडली.

आकाश ज्ञानेश्वर सोनवणे (वय 19, रा. वानवडी), पंकज बाबूराव भालेराव (वय 20, रा.कोंढवा), शंकर हनुमंत राठोड (वय 20, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीएमपीएल बसचे चालक सचिन सायकर (वय 28, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीं हे दुचाकीवरून रस्त्याने जात असताना पीएमपीएलचा धक्का त्यांच्या दुचाकीला लागल्याने चिडून त्या तिघांनी मिळून बसचालक सचिन सायकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे त्या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.