Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‘ट्रिनिटी अकॅडमी’तर्फे नवीन शिक्षण धोरणावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune) व केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स संचालित ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांचा समन्वय’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण बाबत जागरूकता आणि अभ्यासक्रमातील बदल, त्यातील बारकावे, शिकवण्याच्या नव्या पद्धती व आवश्यक कौशल्यांची ओळख करून देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. देशभरातून 200 पेक्षा अधिक शिक्षक या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

प्रेडिक्लाय यूएसएचे सहसंस्थापक सुनील बोडके, सीएसआयआर येथील वरिष्ठ प्रधान शास्त्रज्ञ डॉ. कमल किशोर उके, द सुप्रीम इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक शिवानंद बालगी, एमआयटी (Pune) पुणेचे प्रकल्प संचालक प्रभा कासलीवाल, पाय ग्रीन इनोव्हेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश सावंत, मायलिनचे सहसंस्थापक मनोज देशपांडे आदींनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

नवसंशोधन व विद्यार्थ्यांचा विकास, सर्वच क्षेत्रात दर्जेदार संशोधन, सर्वांगीण व बहुशाखीय शिक्षण, आंत्रप्रेन्युअरशिप, इन्क्युबेशन व स्टार्टअपची भूमिका, उद्योग-शैक्षणिक संस्थांच्या जोडणीतून विद्यार्थ्यांचा विकास आदी विषयांवर विस्तृत चर्चा झाली.

केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘ट्रिनिटी अकॅडमी’चे प्राचार्य प्रा. डॉ. निलेश उके यांनी स्वागत प्रास्ताविक केले. कार्यशाळेचे संयोजन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख दीप्ती कुलकर्णी, समन्वयक दिगंबर जक्कन व सुप्रिया सस्ते यांनी केले.

समीर कल्ला म्हणाले, “भारताचा उत्तम नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण व कौशल्याभिमुख शिक्षणाला केजे शिक्षण संस्थेत नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. नवीन शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे.

संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव नेहमीच दर्जेदार शिक्षणासाठी आग्रही असतात. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. नवीन शिक्षण धोरणामुळे भविष्यात अनेक फायदे होतील, अशी त्यांना आशा आहे.”

Today’s Horoscope 27 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.