_MPC_DIR_MPU_III

Pune: सावधान…लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी होणार जप्त

Pune: Two-wheelers and four-wheelers of citizens Wandering for no reason in lockdown will be confiscated by police सुरुवातीला 5 दिवस केवळ मेडिकल, दवाखाने, बँका, घरपोच गॅस सेवा, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात आज (दि.13) मध्यरात्रीपासून 10 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात (अत्यावश्यक सेवा वगळून) कोणतीही व्यक्ती वाहन घेऊन विनाकारण फिरत असल्यास त्याचे चारचाकी, दुचाकी जप्त करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे. तसेच वाहन परवानाही जप्त करण्यात येणार असून, साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

_MPC_DIR_MPU_IV

पुणे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरुवातीला 5 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. त्याची सर्व तयारी पोलीस, महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुढील महिनाभराचा किराणा, भाजीपाला, फळे, पेट्रोल भरण्यासाठी पुणेकरांनी आजही गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. सुरुवातीला 5 दिवस केवळ मेडिकल, दवाखाने, बँका, घरपोच गॅस सेवा, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

या लॉकडाऊनला पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. भाजपने या लॉकडाऊनवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार, खासदार यांना विचारात न घेता लॉकडाऊन केल्याची टीका खासदार गिरीश बापट यांनी केली.

मात्र, आम्ही सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील लाखो कामगारांना लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यांच्यासाठी पॅकेज देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.