Google Invest In India: गुगल भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, मोदी यांच्याशी चर्चेनंतर पिचाईंची घोषणा

Google to invest Rs 75,000 crore in India, Sundar Pichai announces after talks with PM Modi अवघ्या दोन आठवड्यात गुगल पेच्या माध्यमातून पीएम केअर्स फंडमध्ये 120 कोटी रुपये जमा झाल्याचे ते म्हणाले.

एमपीसी न्यूज- डिजिटल इंडियासाठी येत्या 5 ते 7 वर्षांत गुगल भारतात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केली आहे. भारतासाठी ही मोठी घोषणा आहे. इक्विटी इन्व्हेस्टमेंट, पार्टनरशिप आणि ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चर इकोसिस्टिम इंडस्ट्रीमध्ये ही गुंतवणूक असेल. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी गुगल ही गुंतवणूक करणार असल्याचे पिचाई यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुंदर पिचाई यांची चर्चा झाली. या चर्चेनंतर लगेचच सुंदर पिचाई यांनी भारतात 75 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. अवघ्या दोन आठवड्यात गुगल पेच्या माध्यमातून पीएम केअर्स फंडमध्ये 120 कोटी रुपये जमा झाल्याचेही ते म्हणाले.


पंतप्रधान मोदी यांनी सुंदर पिचाई यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देताना टि्वट केले की, आज सकाळी सुंदर पिचाई यांच्याबरोबर चर्चा झाली. आम्ही अनेक विषयांवर बोललो. विशेषतः तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील शेतकरी, युवक आणि उद्योगपतींचे जीवन बदलण्याविषयी चर्चा केली.


ते पुढे म्हणाले की, सुंदर पिचाई आणि मी कोरोना काळात नव्याने उभारत असलेल्या कार्य संस्कृतीबाबत बोललो. आम्ही या जागतिक महामारीमुळे क्रीडासारख्या क्षेत्रात आलेल्या आव्हानांवरही चर्चा केली. आम्ही डेटा सिक्युरिटी आणि सायबर सिक्युरिटीच्या महत्त्वाबाबत बोललो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.