Pune : सेंट व्हिन्सेंटचे निर्विवाद वर्चस्व; सीएम इंटरनॅशनल संघाचीही आगेकूच

एमपीसी न्यूज : सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघाने (Pune) पुन्हा एकदा वर्चस्वपूर्ण खेळाचे प्रदर्शन करताना आंतरशालेय लॉयला कप फुटबॉल स्पर्धेत तीनही गटात विजय मिळविला. सी.एम. इंटरनॅशनल प्रशाला संघानेही दोन विजय मिळवून आपली आगेकूच कायम राखली.

टाटा ऑटोकॉम्प पुरस्कृत स्पर्धेत 12 वर्षांखालील गटात सम्यक भंडारेच्या तीन गोलच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट संघाने कल्याणी प्रशाला संघावर 7-0 असा विजय मिळविला. आयुष रचलूतुमनी, अंश लोढाने एकेक, अॅन्वीक लोबोने दोन गोल केले.

सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघाने त्यानंतर 14 वर्षांखालील गटात कल्याणी प्रशाला संघावरच 4-0 असा विजय मिळविला. नील जगदाळे, अॅरॉन बाबेन, इथान लोबो, हसन ईस्माईल यांनी (Pune) अन्य गोल केले.

दोन पराभवानंतर कल्याणी प्रशाला संगाने 16 वर्षांखाली गटात मात्र सेंट व्हिन्सेंट संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. कल्याणी प्रशालेसाठी जय कोरो आणि सेंट व्हिन्सेंट प्रशालेसाठी एडन अॅम्ब्रोसने गोल केले.

स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात सी.एम. इंटरनॅशनल प्रशाला संघाने आपली छाप पाडताना 16 वर्षांखालील गटात श्यामराव कलमाडी प्रशाला संघाचा 6-4 असा पराभव केला. विजयी संघाकडून अव्यक्त गुरुवेल्लीनेच सहाही गोल केले. कलमाडी प्रशाला संघाकडून देखील चारही गोल तनिश आयाचितने केले.

त्यानंतर सी.एम. इंटरनॅशनल संघाने 12 वर्षांकालील गटात श्यामराव कलमाडी प्रशाला संघाचा 5-0 असा पराभव वकेला. सी.एम. इंटरनॅशनल संघाकडून पी. कार्तिकेयने चार, तर वियान चोप्राने एक गोल केला.

निकाल –

12 वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट प्रशाला 7 (आयुष रचालुटुनी 15 वे मिनिट, अंश लोढा 18 वे मिनिट, अॅन्विक लोबो 20 वे, 36 वे मिनिट, सम्यक भंडारे 23, 24, 38वे मिनिट) वि.वलि. कल्याणी स्कूल 0

Maharashtra : उपवास म्हणजे काय? तो का व कसा करावा?

सी.एम. इंटरनॅशनल स्कूल 5 (पी. कार्तिकेय 10, 13, 26, 28 वे मिनिट, वियान चोप्रा 12 वे मिनिट) वि.वि. श्यामराव कलमाडी प्रशाला 0

14 वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट प्रशाला 4 (नील जगदाळे 29 वे, अॅरॉन बाबेन 45 वे, इथान लोबो 47 वे, हसमन ईस्माईल 50 वे मिनिट) वि.वि. कल्याणी स्कूल 0

श्यामराव कलमाडी प्रशाला 3 (शिव रोकडे 8वे, आरव बराटे 31वे मिनिट) वि.वि. सी.एम. इंटरनॅशनल स्कूल 1 (वत्सल कुकाडिया 15 वे मिनिट)

16 वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट प्रशाला 1 (एडन अॅम्ब्रोस 10 वे मिनिट) बरोबरी वि. कल्याणी स्कूल 1 (जय कोरो 3 रे मिनिट)

सी.एम. इंटरनॅशनल स्कूल 6 (अव्यक्त गुरुवेल्ली 13, 35, 40, 43, 45, 48 वे मिनिट) वि.वि. श्यामराव कलमाडी प्रशाला 4 (तनिश आयाचित 7, 9, 31, 50 वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.