Pune rain : पुण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

एमपीसी न्यूज : पुण्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोथरूड, कर्वेरोड, स्वारगेट, डेक्कन, सिहंगड परिसरात रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली.(Pune rain) या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट हवामान खात्यानं दिला होता. यलो अलर्ट असल्याने विजांच्या कडकडाटासह शहरात हलक्या पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. पुणे जिल्ह्यात तुफान गारपीट झाली आहे.  मावळमध्ये गारपीटीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झाले आहेत.

Pune : वादळी पावसात झाडे, फांद्या कोसळल्याने वीजयंत्रणेला तडाखा

तर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस असतानाही पुणे शहरातील तापमान वाढल्यानं वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचेही पाहायला मिळाले होते. (Pune rain) पुणे शहरात आणि जिल्ह्यांत 7, 8, 9 तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली होती. या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पुण्यात कोसळल्यानं पुणेकरांची दाणादाण उडाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.