Pune Vaccination News : परदेशी विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व भारतीय सांस्कृतीक परिषदेचा उपक्रम

एमपीसीन्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील परदेशी विद्यार्थ्यांसाठी कोविड-19 प्रतिबंधक लस देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय केंद्र व भारतीय सांस्कृतिक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट अँड युथ’ यांच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

याबाबत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राकडून सर्व संलग्न विभागांना, महाविद्यालयांना, संस्थांना परिपत्रकाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी लिंक उपलब्ध करून दिली असून सर्व परदेशी विदयार्थ्यांना या लिंकवर गूगल फॉर्ममध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

https://forms.gle/9T3UrEkmTGur9ChXA

याबाबत माहिती देताना आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे म्हणाले, 26 जूनपर्यंत विद्यार्थी ही नोंदणी करू शकतील व त्यांनतर प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. हे लसीकरण सर्वांसाठी मोफत असेल.

परदेशी विद्यार्थ्यांकडे भारतीय नागरिकत्व, आधार कार्ड नसल्याने त्यांना लसीकरण करून घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत दिडशे विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे.

डॉ. विजय खरे, संचालक : आंतरराष्ट्रीय केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.