Pune : महापालिकेच्या स्थायी समितीत महिलाराज!; भाजपचे 4, राष्ट्रवादी 2 तर, शिवसेना अन् काँगेसच्या प्रत्येकी 1 नगरसेवकांचा समावेश

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत भाजपच्या 4, राष्ट्रवादीच्या 2 तर, काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 1 नगरसेवकांचा समावेश झाला. राष्ट्रवादीतर्फे अमृता बाबर आणि नंदा लोणकर, भाजपतर्फे वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, उज्वला जंगले, सुनिता गलांडे, काँग्रेसतर्फे लता राजगुरू तर, शिवसेनेतर्फे बाळा ओसवाल यांना स्थायी समितीत काम करण्याची संधी मिळाली आहे. या सर्वांच्या नावाची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घोषणा केली. स्थायी समितीत आता 8 महिला नगरसेविका आणि 8 पुरुष नगरसेवक असतील.

भाजपचे दिलीप वेडेपाटील, रंजना टिळेकर, योगेश मुळीक, उमेश गायकवाड, काँग्रेसच्या वैशाली मराठे, राष्ट्रवादीच्या लक्ष्मी दुधाने, स्मिता कोंढरे या 7 सदस्यांचा 2 वर्षे कालावधी पूर्ण झाला होता. तर, शिवसेनेतर्फे आपल्या सदस्याला 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. विशाल धनवडे यांचा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने बाळा ओसवाल यांना संधी देण्यात आली.

या समितीमध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी नगरसेवकांनी वरीष्ठ नेते मंडळींकडे जोरदार प्रयत्न केले. बऱ्याच जणांना त्यामध्ये अपयश आले. त्यामुळे काही जणांचे चेहरेच पडले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.