Pune News: राहुल देशपांडे यांच्या गायनाने रंगली ‘पुण्यभूषण’ची दिवाळी पहाट!

एमपीसी न्यूज – तीन दशकांपूर्वी पुण्यात ‘दिवाळी पहाट’चे पर्व सुरु करणाऱ्या त्रिदल, पुण्यभूषण फाउंडेशन  यांची यंदाची ‘दीपसूर तेजाळती’ ही दिवाळी पहाट 4 नोव्हेंबर रोजी गणेश कला क्रीडा केंद्र येथे पहाटे साडेपाच वाजता उत्साहात रंगली. पं. राहुल देशपांडे यांनी ही दिवाळी पहाट मैफल सादर केली.

यंदाची ही मैफल पुण्यभूषण आणि सकाळने आयोजित केली, पीएनजीने प्रस्तुत  केली. पुण्यभूषण फौंडेशन आणि त्रिदलचे संस्थापक डॉ सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले.

उल्हास पवार, सौरभ गाडगीळ, डॉ.रवींद्र शिसवे, सम्राट फडणीस, गणेश बीडकर, नितीन न्याती, शिरीष देशपांडे, मंजू फडके यांनी दीपप्रज्वलन केले.

सिप्ला फाऊंडेशन, बालग्राम, अन्नपूर्णा परिवार, डोअर स्टेप स्कूल, शेल्टर असोसिएट या संस्थांचा सत्कार करण्यात आला. पुण्यभूषण फाऊंडेशनचे ज्येष्ठ सहकारी बाळासाहेब सातपुते यांचाही सत्कार करण्यात आला.

आबा बागूल, डॉ. उदय निरगुडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुणेकरांनी या मैफलीला भरभरून प्रतिसाद दिला.

मिलिंद कुलकर्णी, रोहित मुजुमदार, रोहित कुलकर्णी, सुजीत लोहोर, कुंभार, हृषीकेश पाटील, नारायण बिरारी या कलाकारांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन सुरेश धर्मावत (काका) यांनी केले.

प्रथम राहुल देशपांडे यांनी ‘मै जाऊ जगा जगा’ सह रामकली रागातील दोन बंदिशी सादर केल्या. त्यांनी गायलेल्या ‘अलबेला सजन आयो’ ला श्रोत्यांनी दाद दिली.

‘कट्यार काळजात घुसली’ मधील ‘तेजोनिधी लोहगोल’ या  नाट्यपदानेही रसिक पुणेकरांची वाहवा मिळवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.