Crime News : चिंबळी फाट्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – चिंबळी फाट्यावर मोकळ्या जागेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर( Crime News) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारला. ही कारवाई बुधवारी (दि. 12) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली.

 

मटका मालक रफिक शाकीरकाझी (वय 36, रा. चाकण), मंगेश संजय कदम (वय 35, रा. चाकण), आकाश शिवाजी जोगदंड (वय 25, रा. मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश कारोटे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimple Gurav : राष्ट्रवादी काँग्रेस अनुसुचित जमाती सेलच्या वतीने बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंबळी फाटा येथे मोकळ्या जागेत मटका जुगार सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक विभागाला मिळाली.(Crime News) त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली. त्यावेळी तिथे कल्याण ओपन, मुंबई ओपन हा मटका जुगार सुरु होता. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.