Maval : वडगाव मावळ उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे होत असलेल्या (Maval) उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी नऊ कोटी 12 लाख दोन हजार 273 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव अमा आत्राम यांनी गुरुवारी (दि. 13) दिले आहेत.

कान्हेफाटा, वडगाव मावळ येथे पूर्वी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय होते. त्याचे श्रेणीवर्धन करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्यास राज्य शासनाने 1 जुलै 2021 रोजी मान्यता दिली. हे रुग्णालय बेसमेंट, तळमजला अधिक तीन मजले अशी एकूण 10 हजार 253 चौरस मीटर क्षेत्रफळाची असणार आहे.

Crime News : चिंबळी फाट्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

सध्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र सध्या बेसमेंट, तळमजला, पहिला मजला व दुसरा मजला एवढे आठ हजार 121 चौरस मीटर क्षेत्रफळाचे काम होत आहे. (Maval) पुढील बंधाकाम पूर्ण होण्यासाठी तिसरा मजला होणे आवश्यक आहे. तिसऱ्या मजल्याचे काम झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे.

वडगाव मावळ उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसर्या मजल्याच्या बांधकामासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने नऊ कोटी 12 लाख दोन हजार 273 रुपये खर्चासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. निधी मंजूर झाल्याने कामाला वेग येणार आहे. वडगाव मावळ उपजिल्हा रुग्णालयात जुना पुणे-मुबई महामार्गावर आहे. (Maval)महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना तत्काळ चांगल्या उपचारासाठी या रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरचा उपयोग होणार आहे. काम वेळेत पूर्ण झाल्यास मावळ वासियांना या उपजिल्हा रुग्णालयाचा मोठा फायदा होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.