Maval : सोमाटणे टोलनाका अनधिकृत आहे म्हणणे तहसीलदार यांना भोवले; मावळ मधून थेट गडचिरोलीला बदली

एमपीसी न्यूज – मावळचे कर्तव्यदक्ष तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली झाली. त्यांनी मधल्या काळात सोमाटणे टोलनाका अनधिकृत आहे, असे लेखी पत्राद्वारे सांगितले होते.(Maval) हेच त्यांना महागात पडल्याचे म्हटले जात आहे. टोलनाका अनधिकृत आहे, हे म्हणणे शासनाच्या जिव्हारी लागल्याने त्यांची थेट गडचिरोली येथे बदली झाली असल्याची चर्चा मावळ तालुक्यात आहे.

कोरोना साथ येण्यापूर्वी मधुसूदन बर्गे यांची मावळचे तहसीलदार म्हणून बदली झाली. कोरोना काळात त्यांनी उत्तम काम केले. तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केल्याचे प्रशासनातील अधिकारी सांगतात. तालुक्यात ज्या ठिकाणी आंदोलन असेल तिथे जाऊन बर्गे आंदोलकांशी चर्चा करत. अपवाद वगळता त्यांनी सर्व आंदोलनाच्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

Maval : वडगाव मावळ उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर

दरम्यान सोमाटणे येथील टोलनाका अनधिकृत असल्याचे बर्गे यांच्या नावाचे पत्र चर्चेत आले. प्रशासनाने देखील टोलनाका अनधिकृत असल्याचे मान्य केले आहे, तरी देखील तो टोलनाका बंद होत नाही, अशी चर्चा तालुक्यात रंगली. किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन देखील झाले. (Maval) तरीही टोलनाका अद्याप तरी बंद झालेला नाही. मात्र सोमाटणे टोलनाका अनधिकृत असल्याचे सांगणे बर्गे यांना महागात पडले. राज्य शासनाने यामुळेच त्यांची थेट गडचिरोली येथे बदली केली असल्याची चर्चा तालुक्यात आहे. मधुसूदन बर्गे यांची गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी येथे तहसीलदार पदी बदली झाली आहे.

विक्रम देशमुख मावळचे नवे तहसीलदार

मावळ तालुक्याचे नवे तहसीलदार म्हणून विक्रम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाकडून राज्यातील 32 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. (Maval)  त्यात बर्गे यांची बदली झाली. तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले विक्रम देशमुख यांची मावळचे तहसीलदार म्हणून वर्णी लागली आहे..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.