Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे चतुरंग प्रतिष्ठानतर्फे अभिनेता अरुण नलावडे यांच्याशी दिलखुलास गप्पा

एमपीसी न्यूज – चतुरंग प्रतिष्ठान सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याने एका विशेष कार्यक्रमाचे आजोयन करण्यात आले असून, तळेगावकरांना 16 एप्रिल रोजी (Talegaon Dabhade) संध्याकाळी 6 वाजता चतुरंगच्या मुक्तसंध्या या उपक्रमाअंतर्गत अरुण नलावडे यांची मुलाखत अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम कलापिनी येथे रंगणार आहे.

लोकप्रिय कलाकारांचा, ज्येष्ठ मान्यवर मातब्बरांचा रसिकांशी खुला संवाद, गप्पा व्हाव्यात असा चतुरंगच्या मुक्तसंध्या उपक्रमाचा उद्देश आहे. (Talegaon Dabhade) एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व, नाटक, सिनेमा, सिरियल आणि नविन माध्यमातून आपल्याला अजरामर कलाकृतींची पर्वणी देणारे ज्येष्ठ अभिनेते अरूण नलावडे तळेगावकरांशी दिलखुलास गप्पा मारायला येणार आहेत.

Maval : सोमाटणे टोलनाका अनधिकृत आहे म्हणणे तहसीलदार यांना भोवले; मावळ मधून थेट गडचिरोलीला बदली

अरुण नलावडे ह्यांना चतुरंग कार्यकर्ती उत्कर्षा प्रभुदेसाई बोलतं करणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला असणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.