Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी

Rajasthan Political Crisis: Sachin Pilot removed as Deputy Chief Minister and PCC Chief of rajasthan काँग्रेसच्या नेत्यांनी पायलट यांची मनधरणी करण्याचा भरपूर प्रयत्न केला.

एमपीसी न्यूज- बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यावर कारवाई करताना काँग्रेसने त्यांना सर्व पदावरुन हटवले आहे. राजस्थानमधील अशोक गहलोत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले पायलट हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. यापदावरुनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी पायलट यांची मनधरणी करण्याचा भरपूर प्रयत्न केला. तरीही पायलट ऐकण्यास तयार नव्हते. अखेरीस काँग्रेसच्या हायकमांडने हा कठोर निर्णय घेतला. दिल्लीहून जयपूरला गेलेले रणदीप सुरजेवाला यांनी पायलट यांना हटवण्याच्या निर्णयाची घोषणा केली. प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेते गोविंदसिंह डोटासरा यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.

ही घोषणा करताना सुरजेवाला यांनी पायलट यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर केलेल्या ‘उपकारा’ची यादी वाचून दाखवली. कमी वय असतानाही पक्षाने त्यांना जी राजकीय ताकद दिली. ती कोणालाच दिली नव्हते, असे ते म्हणाले.


माध्यमांशी बोलताना सुरजेवाला म्हणाले की, सचिन पायलट आणि काँग्रेसचे काही मंत्री आणि आमदार हे भाजपच्या षडयंत्रानुसार काँग्रेसचे सरकार पाडण्यात सहभागी झाले. मागील 72 तासांत सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी आणि त्यांच्या सहकारी मंत्री, आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आम्ही कित्येकवेळा त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचेही आम्ही म्हटले होते. या चर्चा करा, मतभेद दूर होतील, असे आम्ही म्हटले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.