Pimpri News: कोरोनापूर्वी विधवा झालेल्या महिलांच्या नावे मालमत्तेची नोंद करा – राजू मिसाळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडील कोरोना 19 किंवा अन्य कारणाने विधवा झालेल्या महिलांचे नावे मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यात कोरोनापूर्वी विधवा झालेल्या महिलांचे नाव मालमत्ता हस्तांतरण करण्यात येत नाही. या शिबिरामध्ये त्याचा समावेश करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात मिसाळ यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या करसंकलन विभागाकडील कोरोना -19 किंवा अन्य कारणाने विधवा झालेल्या महिलांचे नावे मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये कोरोना नंतरच्या कालावधीतील विधवा महिलांचे नावे मालमत्ता हस्तांतरीत करणे असे असले तरीही या शिबिरामध्ये कोरोनापूर्वी विधवा झालेल्या महिलांचे नावे मालमत्ता हस्तांतरण करण्यात येत नाही.

शहरामध्ये कोरोनापूर्वी अन्य कारणाने विधवा झालेल्या महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. कोरोनापूर्वी विधवा झालेल्या महिलांचे नावे मालमत्ता हस्तांतरण करुन घेतले तर अशा महिलांना दिलासा व आधार मिळेल, महापालिकेकडे मालमत्ता कर ही जमा होवू शकेल. शिबिराचा कालावधी पाच दिवसाचा असल्याने अधिकृत कागदपत्रे, मुत्यू दाखला , ओळखपत्र इत्यादी जमा करणे विधवा महिलांना जिकरीचे व अडचणीचे होत आहे.

शिबिर कालावधीमध्ये वाढ करण्यात यावी. जेणेकरुन जास्तीत जास्त विधवा महिलांना या शिबिराचा उपयोग होईल. कोरोना पूर्वी अन्य कारणाने विधवा झालेल्या महिलांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातुन मालमत्ता हस्तांतरण करणे तसेच शिबिर कालावधीमध्ये वाढ करावी, संबंधित विभागांना तसे आदेश द्यावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.