Pune : किराणा दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून मागितली दर महिन्याला लाखाची खंडणी

एमपीसी न्यूज – फुरसुंगी येथील किराणा दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच मारहण करून त्यांच्या जवळील रोख 5 हजार रुपये काढून घेतले. ही घटना शुक्रवार (दि.17) रात्री आठ ते शनिवार (दि18) रात्री आठ या दरम्याने मंतरवाडी फाटा येथे फुरसुंगी जवळ घडली.

याप्रकरणी एका 26 वर्षीय इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश मोडक (वय 24, रा. हवेली) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे किराणा दुकानात असताना गणेश मोडक याने त्यांना दुकानाबाहेर बोलावून मोडक आणि त्याच्या साथीदाराने फिर्यादी यांना एक लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी नकार दिला असता त्यांना लोखंडी कोयत्याच्या धाकाने आपल्या गाडीत बसवून मोकळ्या जागेत नेऊन खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या खिशातील 5 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. घटनेनंतर फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी गणेश मोडक याला अटक केली आहे. हडपसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.