Relief Package : देशातील गरीब जनतेला मे व जूनमध्ये मोफत अन्नधान्य पुरविण्याची केंद्र शासनाची घोषणा

एमपीसी न्यूज – देशातील कोविड-19 च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांना सामना कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील 2 महिने अर्थात मे आणि जून 2021 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 (एनएफएसए) अंतर्गत समावेश असणाऱ्या सुमारे 80 कोटी लाभार्थींना दरमहा माणसी 5 किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (पीएम -जीकेवाय)” च्या धर्तीवरच हे वाटप केले जाणार आहे.

या विशेष योजनेअंतर्गत (पीएमजीकेएवाय) अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्राधान्य गृहकर्मी (पीएचएच) या दोन्ही प्रवर्गांतर्गत सुमारे 80 कोटी एनएफएसए लाभार्थ्यांना, एनएफएसए च्या दरमहा नियमित मिळणाऱ्या धान्याव्यक्तिरिक्त दरमहा माणसी 5 किलो अतिरिक्त मोफत धान्य (तांदूळ/गहू) देण्यात येणार आहे.

अन्नधान्य अनुदान आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय सहाय्य केल्यामुळे केंद्र सरकार यासाठी 26,000 कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.