Pune News : गड भटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने तिकोना किल्ल्याची डागडुजी

एमपीसी न्यूज –  उन्हाळा या ऋतुत वणव्यापासून गडाचे संरक्षण व्हावे यासाठी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेतर्फे किल्ल्याच्या डागडुजीचे काम करण्यात आले.  ऋतु प्रमाणे गडकिल्ल्यावर कामे करणे(Pune News) गरजेचे असते. म्हणजे गडावर जो ऋतु चालू आहे ती गरज लक्षात घेवून तसे काम गडावर केल्यास गडावर ज्या काही वास्तू शिल्लक राहिल्या आहेत त्या सुरक्षित राहण्या करीता मदत होते.

सद्याचा ऋतु पाहता गडकिल्ले, डोंगर यावर वणवे लागण्याचा हा काळ आहे. वणव्याने वृक्ष, वन्यप्राणी, किटक, पक्षी यांची किती हानी होते .वणव्यात गडावरील वास्तूंचे ही नुकसान होत असते. वास्तू जवळ तसेच वास्तू वर गवत वाढल्याने, पसरल्याने वणवा लागल्यास वास्तू वणव्याच्या आगीत तप्त होते. वास्तूची डागडुजी नसल्याने त्यात पावसाचे पाणी जावून वास्तू थोड्या मोकळ्या होतात त्यात वणवा लागुन मोठ्या प्रमाणात तापमानात बदल होत राहतात. याचा वास्तूंवर सतत मारा होवून वास्तू कमकुवत होत जातात. त्यात डोंगरावर राहणारे वन्यजीव, किटक, पक्षी, वृक्ष यांना ही आगीची झळ पोहचते.

Nigdi News : स्वउन्नतीसाठी प्रभावमुक्त व प्रकाशयुक्त जीवन महत्वाचे – स्वामी श्रीकंठानंदजी

या वरून आज गडावर वणवा पूर्व तयारी म्हणून मोठ्या प्रामाणात वास्तू जवळ तसेच वृक्षांजवळ  वाढलेले गवत काढण्याचे काम हातात घेण्यात आले.(Pune News)  गडावरील वेताळाचा माळ ते तळजाई माता लेणी पर्यंतचे सर्व गवत काढुन घेतले असुन सदर भागात वाळलेले गवत राहिले नसल्याने आता वणवा लागणार नाही. त्यामुळे वृक्ष, वास्तू, किटक, यांचा वणव्या पासून बचाव होणार आहे.एक प्रकारे हे पुण्याचे  व वास्तू  सुरक्षिततेचे एकत्रित कार्य सोमवारी (दि.6) करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.