Pimpri News : भारतीय जैन संघटना विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज –  भारतीय जैन संघटना विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी (दि.26) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. (Pimpri News) ज्युनिअर विभागातील विद्यार्थ्यांनी शिस्तबध्द संचलना द्वारे मानवंदना दिली.

ध्वजवंदन विद्यालयातील माजी विद्यार्थी नायब सुभेदार सचिन आठरे पाटील आणि भारतीय जैन संघटना जेष्ठ सदस्य सुभाष ललवाणी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष वीरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शुभम कटारिया, सचिव अतुल बोरा, सहसचिव नयन शहा, तेजस कटारिया नगरसेविका सुजाता पालांडे नगरसेविका सुलक्षणा धर विद्यालयाचे प्राचार्य दिलीप देशमुख, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र कोकणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय जाधव, माजी विद्यार्थी जमीर सय्यद, अरविंद भोसले, रोहित पवार,पालक संघ उपाध्यक्ष विक्रम पवार सर्व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे निवृत्त नायब सुभेदार सचिन आठरे पाटील यांनी विद्यालयात शिकत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांना स्वतःतील वेगळेपण ओळखून त्यानुसार ध्येय प्राप्तीसाठी नियोजनबध्द प्रयत्न  करण्याचा संदेश दिला.

Mahavitaran : वीजदरवाढ 37 टक्के नाही तर 14 टक्कयांनी, 37 टक्के वीज दरवाढीचे वृत्त चुकीचे

प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी एकात्मतेचा संदेश देणारे सुंदर गीत सादर केले.विद्यालयात साहित्य,कवायत, लेझीम, योगासने, मनोरे व देशभक्तीपर समूहगीत, समूहनृत्य तसेच नृत्यनाट्य सादरीकरण झाले.

यावेळी विद्यालयातील  निवेदिता धायबर,नीलिमा ब्रह्मेचा, राजश्री पवार,प्रतिभा ढोकरे ,मनोरूपा गायकवाड, वैशाली खुर्पे ,रुपाली चौधरी, शीतल परब विजया बोदडे, चंद्रकांत घोडके, लाला गिरी, धनेश पुरोहित, उमाशंकर धुमनसुरे ,वैभव केसकर, शैला बर्वे, विलास गुंजाळ, स्नेहलता वाडेकर,(Pimpri News) अपर्णा कुमठेकर तसेच प्रदीप बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

अनुजा गडगे यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले. वामन भरगंडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक संजय जाधव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.