Pune News : बाणेर येथे मागासवर्गीय महिलांसाठी निवासी शिक्षण केंद्र

एमपीसी न्यूज – बाणेर येथे मागासवर्गीय आणि आदिवासी महिला-विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, मागासवर्गीय आणि आदिवासी महिला आणि विद्यार्थिनींसाठी बाणेर येथे निवासी शिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात शिक्षण घेणार्या आणि प्रशिक्षणार्थी महिलांना उपयोग होणार आहे. त्यासाठी सर्व करांसह सुमारे 99 लाख रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.