Pune News : ‘नदीकाठ विकास प्रकल्पा’ वर स्थगिती आणण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पुणे आयुक्तांना पत्र 

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात 12 जानेवारी 2023 रोजी जल बिरादरी आणि महाविद्यालयाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘नदीकाठ विकास प्रकल्प’ या विषयावर अभ्याससत्राचे आयोजन करण्यात आले होते. (Pune News) पर्यावरणवादी वास्तूविशारद सारंग यादवाडकर यांनी विद्यार्थ्यांना ‘सदरील प्रकल्पात नेमक होतंय तरी काय , प्रकल्पामुळे भविष्यात उद्भवणारे धोके किती भयावह असतील’ याबद्दल जागरूक केले. त्यामुळे या प्रकल्पावर स्थगिती आणण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी  पुणे आयुक्तांना पत्र लिहले आहे.

‘5000 कोटींच्या ह्या प्रकल्पाची गरज तरी आहे का ?’ हा प्रश्न यादवाडकरांनी उपस्थित केला. त्यांनी या प्रकल्पासबंधित शासनाच्या दोन अहवालांचा आधार देत पुणे महानगरपालिका कशी नागरिकांना फसवते आहे. हे समजावून सांगितले.नदीचं पात्र अरुंद केल्याने शहराला महापुराचा धोका आहे.

Chinchwad News : भारतीय जैन संघटना विद्यालयाच्या वार्षिक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

नदीच्या हक्काच्या जमिनीवर कुणाचेही आक्रमण होता कामा नये असा सूर अभ्यास सत्रानंतर विद्यार्थ्यांचा होता आणि म्हणून ह्या प्रकल्पावर स्थगिती आणावी अशा आशयाची पत्रे (Pune News) विद्यार्थ्यांनी महानगरपालिका आयुक्तांना लिहिली. तसेच त्यांच्याशी याविषयावर असलेल्या गंभीर प्रश्नांविषयी बोलण्यासाठी प्रत्यक्ष भेटीची इच्छाही व्यक्त केली. आणि या प्रकल्पाला विरोध म्हणून एक दिवस उपवास करण्याचा निश्चयही केला.

कार्यक्रमासाठी जल बिरादरीचे महाराष्ट्र राज्य प्रमुख  नरेंद्र चुघ, युवा जल बिरादरीचे राष्ट्रीय संयोजक गिरीश पाटील तसेच पर्यावरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. रुपाली गायकवाड उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.