Talegaon Dabhade : शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याची रोटरीची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्यातर्फे ‘शाडूच्या मातीचे श्रीगणेश’ बनवण्याची ऑनलाईन कार्यशाळा शनिवारी (दि. 4) स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे घेण्यात आली. या कार्यशाळेत 500 जणांनी सहभाग घेतला. पर्यावरणाच्या संरक्षणाची भावना रुजावी व स्वनिर्मितीचा निखळ आनंद मिळावा, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

पर्यावरणाच्या संरक्षणाची भावना रुजावी व स्वनिर्मितीचा निखळ आनंद मिळावा, या उद्देशाने घेण्यात आलेल्या या कार्यशाळेकरीता प्रसिद्ध शिल्पकार अतिश थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. च्या अध्यक्षा रो.सुमती निलवे, रो. मिलिंद शेलार तसेच इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य रो. डॉ. संभाजी मलघे, रो.विल्सन सालेर, रो.प्रविण जाधव, रो.सुनील खोल्लम, रो. योगेश शिंदे, शालेय पर्यवेक्षिका सौ. रेणू शर्मा मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिल्पकार  अतिश थोरात यांचा स्वागतपर सत्कार  सुमती निलवे यांनी केला. प्रसिद्ध शिल्पकार अतिश थोरात यांनी शाडूच्या मातीपासून अतिशय सुंदर, सुबक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वनिर्मिती रुजण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कार्यशाळेस उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास 500 विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा त्यांनी आनंद घेतला.

या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.चे संस्थापक अध्यक्ष मा. रो. संतोष खांडगे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.