RSS : जेष्ठ स्वयंसेवक पद्माकर गोपाळ वझे यांचे दुःखद निधन

एमपीसी न्यूज : आज जेष्ठ स्वयंसेवक पद्माकर गोपाळ वझे (RSS) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांचा जन्म 20 सप्टेंबर 1929 रोजी झाला. त्यांचे एम.ए.एल.एल.बी. इतके शिक्षण झाले होते. त्यांनी साधारणपणे 1951 च्या दरम्यान आसाममध्ये संघाचे प्रचारक म्हणून काम केले. प्रचारक म्हणून थांबल्यावर त्यांनी दादर, मुंबई येथे संघाचे काम केले. त्याच काळात साप्ताहिक विवेकमध्ये त्यांनी काही वर्ष काम केले. स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी ग्लॅक्सो इंडियामध्ये नोकरी सुरू केली. तेथे एक्झिक्युटिव्ह (पर्सोनेल) म्हणून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात भारतीय मजदूर संघ, स्वरूप वर्धिनी, श्रम सेवा न्यास, ग्राम विकास संस्था यांच्या कामाशी ते जोडलेले होते.

PCMC : ‘शिल्पांना’ सत्ताबदलाचा फटका; उद्‌घाटन रखडले!

अनेक संस्थांना त्यांनी सढळ (RSS) हाताने मदत केली. गरजू व्यक्तींनाही शिक्षणासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ते मदत करत असत. बुद्धीप्रामाण्य, तर्कशुद्ध विचार, अत्यंत संवेदनशीलता, गरीब व शोषित यांच्याबद्दल कळवळा, मदतीचा स्वभाव, वक्तशीरपणा हे त्यांचे विशेष गुण होते. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान बहीण पुतणे, पुतण्या, भाचे असा मोठा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.