RTE admission : आरटीईअंतर्गत प्रवेश 13 एप्रिलपासून;ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत जाहीर

एमपीसी न्यूज : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन (RTE admission) प्रवेश प्रक्रियेची सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली. प्रवेश जाहीर झालेल्या मुलांना येत्या 13 एप्रिलपासून प्रवेश निश्चित करता येणार असून, प्रवेशाची अंतिम मुदत 30 एप्रिल राहणार आहे. पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर 12 एप्रिलला दुपारी तीन वाजतापासून प्रवेशाचा मेसेज पाठवण्यात येणार आहेत.

Sassoon ACB action : साठ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरला अटक

प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत आरटीईची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यंदा आरटीईसाठी विक्रमी अर्ज आले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेश (RTE admission) निवडीसाठी सोडत काढण्यात आली. यंदा राज्यभरातून 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी तीन लाख 64 हजार 390 इतके विक्रमी अर्ज आले आहेत.

निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी पाल्यांना 12 एप्रिलला दुपारी तीन वाजल्यापासून मोबाइलवर मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर 30  एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी पालकांना 13 ते 25 एप्रिलपर्यंत आपल्या पाल्यांचे प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी समितीकडून तपासणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे, असे गोसावी यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.