Sassoon ACB action : साठ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरला अटक

एमपीसी न्यूज – डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी साठ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. (Sassoon ACB action) ही कारवाई बुधवारी (दि. 6) ससून रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात करण्यात आली.

पवन भिला शिरसाट (वय 43) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

Wakad : रिक्षा चालकावर प्राणघातक हल्ला करत वाहनांची तोडफोड आणि दहशत

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सरकारी नोकरी आहेत. त्यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट काढायचे होते. त्यासाठी त्यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात अर्ज केला. (Sassoon ACB action )आरोपी डॉ. पवन शिरसाठ हे ससून रुग्णालयात भौतिकोपचार तज्ञ म्हणून काम करतात. तक्रारदार यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांना पैसे द्यावे लागतील असे सांगून त्यांनी तक्रारदार यांच्याकडे साठ हजार रुपयांची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने ससून रुग्णालयात सापळा लावला. त्यामध्ये बुधवारी डॉ. पवन शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडून साठ हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबी पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.