Pune News : “ताई नको, राजीनामा नका देऊ”, चाकणकरांनी राजीनाम्याची घोषणा करताच महिला पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर

एमपीसी न्यूज – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बुधवारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर या बैठकीत एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आला. रुपाली चाकणकर यांनी राजीनाम्याची घोषणा करताच उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाषण करताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, महिला प्रदेशाध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल जयंत पाटील आणि पक्षाचे आभार मानते. माझ्याकडे महिला आयोगाचा अध्यक्ष पद देखील आहे. हे पद संविधानिक असल्यामुळे निपक्षपातीपणे काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी आज राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देते.

रूपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं कळताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. सभागृहात उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी ताई नको, ताई नको, ताई तुम्ही राजीनामा देऊ नका असं म्हणू लागल्या. तर काही महिला पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. यानंतर चाकणकर यांनीही काही काळ भाषण थांबवलं. सर्व आवाज शांत झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.