Pimpri News : शैक्षणिक तक्रारींच्या निवारणासाठी आठवड्याला जनसभा घेण्याची रयत विद्यार्थी विचार मंचाची मागणी

एमपीसी न्यूज –  पिंपरी चिंचवड शहरातील शैक्षणिक तक्रारींच्या निवारणासाठी आठवड्याला जनसंवाद सभा घ्यावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे,पिंपरी चिंचवड शहर संघटक अभिजित लगाडे उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या शाळा, अनुदानित, विनाअनुदानित तसेच खाजगी शाळा, अनधिकृत शाळा मोठ्या प्रमाणात आहेत.शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो अनेक शाळा उद्धटपणे विद्यार्थी व पालकांशी वर्तन करतात.

फि अभावी विद्यार्थ्यांना शाळेत बसू न देणे, परीक्षेस बसू न देणे, शाळा सोडल्याचे दाखला अडवणे, गुणपत्रिका न देणे, RTE मध्ये प्रवेश झालेल्या विद्याथ्यांकडून बेकायदेशीरपणे आर्थिक लूट करणे, अश्या अनेक तक्रारी शैक्षणिक विभागाकडे येत असतात.परंतु शिक्षण विभागाकडून शैक्षणिक तक्रारींची गंभीरतेने दखल घेतली जात नाही.

असे अनेक शैक्षणिक प्रश्र असताना शिक्षण विभागात मात्र शिक्षण अधिकारी अनेक वेळा उपलब्ध होत नाहीत. अशा अनेक प्रश्नांची माहिती करुन घेण्यासाठी महापालिकेने दर आठवड्याला शैक्षणिक जनसंवादाचे आयोजन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.