Moshi news : मोशी येथे गोवंश सदृश मांस विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : गोवंश सदृश मांस विक्री प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Moshi news) ही कारवाई रविवारी (दि. 18) पहाटे सव्वापाच वाजता पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे घडली.

आदिल रशीद शेख (वय 25, रा. रामवाडी, जि. अहमदनगर), रहमुद्दीन मेहबूब कुरेशी (वय 30, रा. माजलगाव, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई श्रीकांत एनगुंदल यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Shramik Patrakar Sangh : विद्यार्थ्यांचा गृहपाठ हे पालकांचे कर्तव्य ,ते रद्द करू नका 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील दोन कारमध्ये गोवंश सदृश्य मांस विक्रीसाठी वाहतूक केली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे सापळा लावून दोन कार ताब्यात घेतल्या. त्यामध्ये गोवंश सदृश मांस आढळून आले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.(Moshi news) एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.