Chinchwad : दुबई आलिंपियाडमध्ये समृद्धी यादवला सुवर्णपदक

एमपीसी न्यूज – ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट आणि कल्चरल यांच्या वतीने व युनेस्कोच्या सहकार्याने दुबई येथे आयोजित आठव्या कल्चरल डान्स ऑलिंपियाड स्पर्धेत चिंचवड, शाहूनगर येथील समृद्धी यादव हिने ज्युनिअर सोलो अथिनिक या नृत्य प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले.

समृद्धी ही सध्या अभिषेक विद्यालयात दहावीत शिकत असून सुप्रिया डान्स अकादमीमध्ये सुप्रिया संत यांच्याकडे ती नृत्याचे धडे घेत आहे. साहित्य संमेलन, नाट्यसंमेलन, विविध नृत्य स्पर्धांमध्ये 100 पेक्षा जास्त पारितोषिके मिळविली आहेत. 2010 मध्ये बँकॉक येथे रौप्य पदक, 2013  मध्ये दुबई येथे रौप्यपदक, 2016 मध्ये कोलंबो येथे सुवर्णपदक मिळवले आहे.

राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत विविध विभागांत ती गेली नऊ वर्षे नृत्य सादर करत आहे. यापूर्वी तिला राष्ट्रीय स्तरावरील सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला आहे. ‘इंद्रा’ या सिनेमातही तिने नृत्य सादर केले आहे. समृद्धीच्या यशासाठी तिची आई सुमन व वडील दत्तात्रय यादव यांनी प्रयत्न केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.