Sangavi : गर्दीचा फायदा घेऊन पळवला मोबाईल

एमपीसी न्यूज – किराणा दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन (Sangavi) अज्ञाताने एका व्यक्तीच्या खिशातून मोबाईल फोन काढून नेला. ही घटना गुरुवारी (दि.8) रात्री रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, पिंपळे गुरव येथे घडली.

विशाल दीपक गायकवाड (वय 35, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News: कष्टकरी कामगारांचा मोर्चा विधानभवनावर धडकणार – काशिनाथ नखाते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे 8 डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास रामकृष्ण मंगल कार्यालय चौक येथील एका किराणा दुकानात गेले होते. तिथे दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने फिर्यादीच्या खिशातून 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.