Sangvi : पार्ट आणतो म्हणून गेला अन गायब झाला

एमपीसी न्यूज – महागड्या कारसाठी एक पार्ट कात्रज येथे मिळतो. तो आणण्यासाठी मेकॅनिकने एकाकडून दुचाकी आणि दोन हजार रुपये घेतले. ते घेऊन तो पार्ट आणण्यासाठी गेला, पण पाच दिवसानंतर देखील तो परत आला नाही. यावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश कृष्णराव तट्टे (वय 45, रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव ) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मन्सूर शेख (रा. इंदापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कोडा कार साठी स्लीव्ह सिलेंडर कात्रज येथे मिळतो. तो आणण्यासाठी आरोपी मन्सूर याने फिर्यादी राजेश यांच्याकडून दोन हजार रुपये आणि त्यांची दुचाकी घेतली. ते घेऊन तो कात्रज येथे पार्ट आणण्यासाठी रविवारी (दि. 16) सकाळी नऊच्या सुमारास गेला. पाच दिवस झाले तरी तो परतला नाही. यावरून राजेश यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.