Sangvi Crime News: पिस्तुलाचा धाक दाखवून 50 हजारांची सोनसाखळी पळवली

एमपीसी न्यूज – रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवला आणि शतपावली करणा-या व्यक्तीच्या गळ्यातील 50 हजार रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

जसवंत कुमार अगरवाल (वय 42, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अगरवाल रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते गोविंद गार्डन चौकातून पिके चौकाकडे जाणा-या ब्रिज जवळून जात होते. ब्रिज संपतो त्या ठिकाणी आले असता दोन अनोळखी व्यक्तींनी अगरवाल यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यांच्या गळ्यातील 15 ग्राम वजनाची 50 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेली. याबाबत अगरवाल यांनी रात्री गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.