India Corona Update : गेल्या 24 तासांत 10.55 लाख चाचण्या पूर्ण तर, 78,761 नवे रुग्ण

देशाचा रिकव्हरी रेट 76.47 टक्के एवढा झाला आहे. देशातील मृत्यू दर 1.81 टक्के आहे

एमपीसी न्यूज – देशात दिवसेंदिवस केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 10 लाख 55 हजार 027 नमुने तपासण्यात आले आहेत. यासह देशातील कोरोना बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात सर्वाधिक 78 हजार 761 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 35 लाखांच्या पुढे गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 35 लाख 42 हजार 734 एवढी झाली आहे. देशात सध्या. 7 लाख 65 हजार 302 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकूण बाधित रुग्णांपैकी जवळपास 27 लाख 13 हजार 934 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 948 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात आजवर 63 हजार 498 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात आजवर 4 कोटी 14 लाख 61 हजार 636 नमुने तपासण्यात आले आहेत. मागील 24 तासांत देशभरात आजवरच्या सर्वाधिक 10 लाख 55 हजार 027 चाचण्या पार पडल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1299917230344253447?s=20

देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 64 हजार 935 कोरोनामुक्त रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 76.47 टक्के एवढा झाला आहे. देशातील मृत्यू दर 1.81 टक्के आहे. देशात सध्या केवळ 0.29 टक्के रुग्ण व्हेन्टीलेटर वर आहेत तर, 1.93 टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 4.0 ची नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार देशात कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबर पर्यंत लाॅकडाऊनचे नियम तसेच राहणार आहेत. नव्या नियमानुसार देशात सात सप्टेंबर पासून मेट्रो रेल्वे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शंभर लोकांच्या उपस्थिती सह राजकीय, मनोरंजन, खेळ, धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांना 21 सप्टेंबर पासून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी मास्क, सोशल डिस्टंसिंग, थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश, सॅनिटायझर या गोष्टींचा वापर बंधनकारक राहणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.