Sangvi Crime News : लग्नास नकार दिल्याने तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – लग्नास नकार देऊनही तरुणीला मोबाइलवर वारंवार मेसेज करून त्रास दिला. याप्रकरणी एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी सांगवी येथे घडली.

शुभम वंसत केदार (रा. नांदेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडित तरुणीने रविवारी (दि. 16) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी तरुणीचा लांबचा नातेवाईक आहे. आरोपी शुभम याने फिर्यादी तरुणीला लग्नाबाबत विचारले. मात्र तिने लग्नास नकार दिला. त्यानंतरही आरोपी शुभम याने फिर्यादी यांच्या आईच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज केला. “मला तुझ्या आईशी बोलायचे आहे. रिप्लाय तरी कर यार. आय लव्ह यू. मी तुला खूप मिस करतोय,’ असा मेसेज करून छुपा पाठलागही केला.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.