Sangvi : ‘भावाला टोमणे का मारतोस ?’ विचारल्यावरून मुलाने घातला आईच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक

एमपीसी न्यूज – एक भाऊ दुस-या भावाला शाब्दिक टोमणे मारत होता. त्यामुळे आईने टोमणे मारणा-या मुलाला विचारले की, टोमणे का करतोस? यावरून चिढलेल्या मुलाने आईच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला. यामध्ये आई गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. यावरून आईने मुलाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

शामल अरुण भुजबळ (वय 55, रा. राजीवगांधी नगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित अरुण भुजबळ (वय 35, रा. राजीवगांधी नगर, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित हा फिर्यादी शामल यांचा मुलगा आहे. अमित मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घरी आला. तो त्याच्या भावाला शाब्दिक टोमणे मारून बोलू लागला. हा शाब्दिक टोमण्यांचा वाद वाढू नये यासाठी आई शामल यांनी मध्यस्थी करत अमितला विचारले की, टोमणे का करतोस? यावरून रागावलेल्या अमितने घराबाहेर पडलेला सिमेंटचा गट्टू शामल यांच्या डोक्यात मारला. यात शामल गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी मुलाविरोधात फिर्याद नोंदवली. आरोपीला अद्याप अटक केली नसून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.