Pune : हेल्मेट सोडून सर्व काही विचारा- गिरीश बापट

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा नियोजन समितीची आज बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत हेल्मेट सक्तीबाबत चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र पोलीस विभागाच्या चर्चेच्या सुरुवातीला खासदार आणि आमदार यांना पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, ‘हेल्मेट सोडून सर्व विचारा’. त्यामुळे पुणे शहरातील एकाही लोकप्रतिनिधी हेल्मेट सक्तीचा मुद्दा उपस्थित केला नाही.

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे पार पडली. या बैठकीला शहर आणि ग्रामीण भागातील खासदार, आमदार, अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा देखील झाली. मागील आठवड्याभरापासून पुणे पोलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात अनेक संघटना रस्त्यावर आल्या आहेत.

या प्रश्नावर चर्चा होणे अपेक्षित असताना पोलीस विभागाच्या चर्चेच्या सुरुवातीला पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित लोकप्रतिनिधींना हेल्मेटचा विषय सोडून दिल्यामुळे हेल्मेट प्रश्नवर शहरातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने भूमिका मांडली नाही. त्यामुळे पुणेकर नागरिकांना हेल्मेट सक्तीला सामोरे जावे लागणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.