Sangvi : कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – सकाळी कामावर जाणा-या तरुणाला फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल देण्यास भाग पाडले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी साडेपाचच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

आकाश सोमनाथ जाधव (वय 20, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवली. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • आकाश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश जाधव सकाळी साडेपाचच्या सुमारास कामावर जात होते. ते पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराच्या समोरील पुलावर आले असता दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यातील एकाने फोन करण्यासाठी मोबाईल फोन विचारला.

गरजूला मदत करण्यासाठी आकाशने मोबाईल फोन काढला. त्यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने आकाश यांच्या हातातून मोबाईल फोन हिसकावून घेतला. आकाश यांनी फोन मागितला असता त्यांना कोयत्याचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.