Chinchwad : पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना चिंचवड मधील दळवी नगर येथे सोमवारी (दि. 30) दुपारी पाचच्या सुमारास घडली.

आकाश कसबे (वय 23, रा. दळवी नगर, चिंचवड) या जखमी तरुणाने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशचे काही तरुणांसोबत मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने आकाशला सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास मारहाण केली. त्यातील एकाने धारदार शस्त्राने आकाशच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून सात जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.