Maharashtra Police : संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बदली

एमपीसी न्यूज – संजय पांडे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली झाली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी सोमवारी (दि. 28) आदेश दिले आहेत. त्यामध्ये भारतीय पोलीस सेवेतील राज्यातील पोलीस महासंचालक दर्जाच्या दोन अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर संजय पांडे कार्यरत होते. त्यांची बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

तर बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर बदली करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.