Sanskar Pratishthan : नवरात्रीत पोलिसांना सहकार्य करणाऱ्या संस्कार प्रतिष्ठानच्या सदस्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने चतुश्रुंगी नवरात्र उत्सवामध्ये (Sanskar Pratishthan) संपुर्ण 10 दिवस संस्कार प्रतिष्ठानचे विशेष पोलीस अधिकारी म्हणुन सभासद काम करणाऱ्यांचा पोलिसांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आहे.

पुणे परिमंडळ 4 अंतर्गत चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून 30 सभासद तुझ्यासाठी चतुश्रुंगी देवस्थान परिसरात सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत वाहतुक नियंत्रणापासुन ते मंदिराच्या गाभाऱ्यात पर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताला मदत करित होते.

दस-याच्या दिवशी देवीची पालखी व मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व विशेष पोलीस अधिकारी यांचे कौतुक करण्यात आले समारोप प्रसंगी (Sanskar Pratishthan) प्रत्येक सभासदाला प्रमाणपत्र व मिठाईचा बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले.

Alandi Protest : शिवसेनेचे निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्याने आळंदीत निषेध मोर्चा

तसेच चतुश्रुंगी वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब कोळी आणि पोलीस उपनिरिक्षक मोहन जाधव यांनी सर्व सभासदांचे कौतुक करुन त्यांनीही प्रत्येक सभासदाला (Sanskar Pratishthan) प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले प्रतिष्ठानचा हा पहिलाच सन्मान असा होता की दोन्हीही विभागांनी कौतुक केले संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांनी आभार मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.