Satyam Jewellers: सत्यम ज्वेलर्सच्या ‘Embrace Yourself’या मंगळसूत्र महोत्सवाला दिमाखात सुरुवात

एमपीसी न्यूज : – पिंपरी-चिंचवडच्या सोने चांदी उद्योगातले मध्यवर्ती नाव म्हणजे – सत्यम ज्वेलर्स होय. आपल्या उत्कृष्ठ कारागिरीसाठी आणि ग्राहक बांधिलकीसाठी प्रसिद्ध असलेल्या सत्यम ज्वेलर्सने यंदा ‘Embrace Yourself’ मंगळसूत्र महोत्सवाला दिमाखात सुरूवात केली आहे.

Talegaon : बनावट कागदपत्रांच्या आधारे सव्वा तीन कोटींची फसवणूक

स्त्री स्वत्वाची जाणीव या अनोख्या संकल्पनेला प्राधान्य देऊन सत्यम ज्वेलर्सने या मंगळसूत्र महोत्सवाला प्रारंभ केला आहे. हा महोत्सव केवळ आकर्षक मंगळसूत्रांच्या डिझाईन्सचे प्रदर्शनच करत नाही तर महिला सशक्तीकरणाचा पुरस्कार देखील करतो.

ग्राहकांना ‘Embrace Yourself’ मंगळसूत्र महोत्सवामध्ये खरेदीचा आनंद घेता यावा यासाठी सोने मंगळसूत्राच्या घडणावळीवर सत्यम ज्वेलर्स आपणास देत आहेत चक्क फ्लॅट 30 %ची खास सूट. ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सत्यम ज्वेलर्स आपणां सर्वांना आमंत्रित करीत आहेत. हि ऑफर निगडी, चाकण आणि कृष्णानगर शाखांमध्ये उपलब्ध आहे.

भारतीय जीवन पध्दतीत कुटुंबसंस्थेत अत्यंत मोलाचे स्थान आहे. या कुटुंबसंस्थेचा पाया म्हणजे आपली विवाहसंस्था होय. सोळा संस्कारांपैकी ‘विवाह’ हा संस्कार स्त्री-पुरुषाच्या जीवनात उदात्त, मंगल, भावरम्य संस्कार मानला जातो. या विवाहाची अर्थपूर्णता ‘मंगळसूत्र’ या दागिन्यांची मानली गेली आहे.मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखले जाते. लग्नानंतर स्त्रियां हे धारण करतात. मंगळसूत्र हे पतीबद्दलचे प्रेम आणि आदराचे लक्षण आहे. पतीवरील सर्व संकटे दूर करण्यासाठी हे महत्वाचे असते. मंगळसूत्रात दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात.

मध्यभागी 4 छोटे मणी आणि 2 लहान वाट्या असतात. दोन दोरे म्हणजे पती- पत्नीचे बंधन. 2 वाट्या म्हणजे पती-पत्नी, तसेच 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे. स्त्री- मनाला मंगळसूत्राची नेहमीच भुरळ पडलेली आहे. कालानुरूप मंगळसूत्र आपली छबी प्रत्येक पिढीवर उमटवत आले आहे. पारंपारिक ते आधुनिक मंगळसूत्रापर्यंत प्रत्येक पिढीला आवडतील अशी अनेक मंगळसूत्राची परंपरा सत्यम ज्वेलर्सने जपली आहे.

सत्यम ज्वेलर्स म्हणजे आपल्या पिंपरी-चिंचवड परिसरातील 40 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास खऱ्या अर्थाने मिळवणारी पेढी. ग्राहक सत्यम ज्वेलर्सकडे फक्त मंगळसूत्र महोत्सवानिमित्त सोने खरेदी करण्याचं ठिकाण म्हणून कधीही बघत नाहीत तर आपल्या अविस्मरणीय क्षणांना नवा उजाळा मिळावा, आयुष्याच्या चढ-उतारात, गोड-सुखी क्षणांत अजून काही अविस्मरणीय क्षण निर्माण व्हावेत यासाठी सत्यम ज्वेलर्सला मनापासून आपला सोबती मानतात.

आणि सत्यम ज्वेलर्सही ग्राहकांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही. ‘Embrace Yourself’ मंगळसूत्र महोत्सवानिमित्त सत्यम ज्वेलर्स पारंपारिक मंगळसूत्र परिधान करणाऱ्या आजीपासून ते आधुनिक मंगळसूत्राची क्रेझ असणाऱ्या तरुणाई पर्यंत सगळ्यांना एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

म्हणूनच सत्यम ज्वेलर्स ‘Embrace Yourself’ मंगळसूत्र महोत्सवानिमित्त घेऊन आले आहेत जुन्या काळापासून ते आधुनिक काळापर्यंत च्या मंगळसूत्राच्या असंख्य व्हरायटीज. सत्यम ज्वेलर्स दागिन्यांच्या विविधता,अप्रतिम डिझाइन्स आणि सोने,चांदी, डायमंड्स आणि घडणावळीचा माफक दर ह्यामुळे ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

गेली 40 वर्षे सत्यम ज्वेलर्सला आपली सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सत्यम ज्वेलर्स आपल्या असंख्य ग्राहकांचे आभार आणि अभिनंदन करीत आहे !लवकरच सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, चाकण आणि कृष्णानगर शाखांना भेट द्या आणि आनंद घ्या ‘Embrace Yourself’ मंगळसूत्र महोत्सवाचा !

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share