Pimpri News : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये ‘क्रांती ज्योती सावित्रीबाई’ यांची पुण्यतिथी साजरी

एमपीसी न्यूज :  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाईपुण्यतिथी साजरी करण्यात आली. (Pimpri News) यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आसमी कारवल,अंकिता पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई याच्याबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहशिक्षिका साळवी मॅडम यांनी सावित्रीबाईचे विचार विद्यार्थंना आपल्या भाषणातून सांगितले .

Chinchwad News : संभाजी उद्यानात महिला दिनानिम्मित विविध उपक्रम

सहशिक्षिका सरला शिंदे यांनी ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे पाप समजलं जायच त्या काळी ज्योतीबांनी आपल्या पत्नी म्हणजेच सावित्रीबाईंचे साक्षर करून महिलांना शिक्षण (Pimpri News) देण्याच काम त्यांनी केलं,सती प्रथा, विधवा विवाह याच्या विरोधात बंड केले. दलितांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका केतकी पाटील मॅडम व देवर्षी मॅडम यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.