Pune News : सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेत कॉन्स्टलेशन चिताज, मॅट्रिक मार्व्हल्स अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज :  मॅट्रिक मार्व्हल्स आणि कॉन्स्टलेशन चिताज संघांनी येथे सुरु असलेल्या सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेत 15 वर्षांखालील गटातून अंतिम फेरी गाठली. (Pune News) मोशी येथील सिटी स्पोर्टस एरेना येथे स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने सिटी एफसी संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

15 वर्षांखालील गटात कॉन्स्टलेशन चिताज संघाने निर्विवाद वर्चस्व राखले. त्यांनी प्रथम प्रतिक ढवळे, अर्णव पाटीलच्या गोलच्या जोरावर टीएमपी टायगर्स संघाचा 2-1 असा पराभव केला. टायगर्सकडून एकमात्र गोल आरव वानखेडेने नोंदवला. त्यानंतर अर्णव बोराटेने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर चिताज संघाने जीएनएस गनर्सचा 1-0 असा पराभव केला. मात्र, पहिल्या सामन्यात त्यांना मॅट्रिक मार्व्हल्सकडून 2-0 असा पराभव पत्करावा लागला होता. शिवम पाटील, देवेंद्र सिंगने  गोल केले.

मॅट्रिक मार्व्हल्स संघाने अन्य सामन्यात जीएनएस गनर्स संघाचा 40 अस धुव्वा उडवला. अस्मित दास, देवेंद्र सिंग, शिवम पाटील, पियुष दांगट यांनी गोल केले.

Pune News : राष्ट्रध्वजाचा सन्मानासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जनजागृती

स्पर्धेतील 15 वर्षांवरील गटात सक्सेस स्ट्रायकर्स संघाने अखेरच्या दिवशी वर्चस्व राखले आणि बाद फेरीत अशक्य वाटणारा प्रवेश शक्य करून दाखवला. अवघ्या एका गोलच्या फरकाने सक्सेस संघाने अंतिम फेरीत  प्रवेश मिळविला.

सक्सेसने पहिल्या साम्नयात आदित्यऑल स्टार्सचा 3-1 असा पराभव केला. नंतर त्यंनी प्रबळ पॅंथर्सवर 1-0 अशी मात केली.

 

निकाल –

15  वर्षांखालील : मॅट्रिक मार्व्हल्स 2 (शिवम पाटील 13 वे, देवेंद्र सिंग 17 वे मिनिट) वि. वि. कॉन्स्टलेशन चिताज 0

टीएमपी टायगर्स 1 (आर्यन मासुळकर 10 वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स 0

कॉन्स्टलेशन चिताज 2 (प्रतिक ढवळे 15 वे मिनिट,अर्णव पाटील२१वे मिनिट) वि.वि. टीएमपी टायगर्स 1 (आरव वानखेडे 5 वे मिनिट)

मॅट्रिक मार्व्हल्स 4 (अश्मित दास 7 वे, देवेंद्र सिंग 13 वे मिनिट,  पियुष दांगट 15 वे मिनिट, शिवम पाटील 17 वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स 0

कॉन्स्टलेशन चिताज 1 (अर्णव बोराटे 16 वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स 0

मॅट्रिक मार्व्हल्स 1 (शिवम पाटील 8 वे मिनिट, वि. वि. टीएमपी टायगर्स 0

15 वर्षांवरील – ज्योती जग्वॉर्स 1 (गणेश आवळे 14 वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स 0

सक्सेस स्ट्रायकर्स 3 (स्वप्नील महामुनी 11 वे मिनिट, किरण गायकवाड 16 वे मिनट,अमित जरे 23 वे मिनिट) वि.वि. आदित्य ऑलस्टार्स 1(सौरिन 7 वे मिनिट)

सक्सेस स्ट्रायकर्स 1 (अमित जरे 7 वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स 0

ज्योती जग्वॉर्स 2 (राजवर्धन देशमुख 8 वे, 19 वे मिनिट) वि.वि. आदित्य ऑलस्टार्स 1 (वरुण लाड 12 वे मिनिट)

आदित्य ऑलस्टार्स 2 (माधव अभय 10 वे मिनिट, वरुण लाड 19nवे मिनिट) वा.वा. प्रबल पँथर्स 1 (रितेश बाबर 6 वे मिनिट)

ज्योती जग्वॉर्स 1 (राजवर्धन देशमुख 12 वे मिनट) बरोबरी वि. सक्सेस स्ट्रायकर्स 1 (अमित जरे 18 वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.