Talegaon : खांड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शंकरराव शिंदे

एमपीसी न्यूज – शंकरराव अनंतराव शिंदे यांची खांड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विठ्ठल वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नामदेव घुडे यांनी सोसायटीच्या अध्यक्षपदाचा तर उपाध्यक्षपदाचा गबाजी पिंगळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी शंकरराव शिंदे तर उपाध्यक्षपदासाठी विठ्ठलराव वाडेकर यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. पी. खोतकर
यांनी केली.

यावेळी सचिव मदन अडीवळे, ज्येष्ठ संचालक रामभाऊ देशमुख, नाथाभाऊ पिंगळे, नामदेव शेलार, महादू क्षिरसागर, गेणू मोरमारे, राम भाऊ जाणकर, चिंधाबाई शिंदे, नयना बो-हाडे, नामदेव घुडे, गबाजी पिंगळे हे संचालक उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष शंकरराव शिंदे हे तळेगाव दाभाडे येथील धर्मवीर नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यामान खजिनदार असून कुसवली – नागाथली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.