Pimpri: वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून शरद बाराहाते यांची गरजूंना मदत

Sharad Barahate helps the needy by avoiding unnecessary birthday expenses in pimpri

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शरद बाराहाते यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून काळभोरनगर मदर तेरेसा होम येथील रुग्णांना फळे, अन्नधान्य वाटप, चिंचवड गावातील चापेकर विद्यालय येथील अनाथ विद्यार्थ्यांना अन्नधान्य वाटप आणि मौनीबाबा वृध्दाश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी अन्नधान्य, फळे वाटप करताना कोणतीही गर्दी केली नाही. सुरक्षित अंतरही पाळले गेले. याप्रसंगी नगरसेवक केशव घोळवे, उद्योजक नरेश कदम, उमेश गुंजोटे, परीट संघटनेचे सुनिल अंभग, किरण लोंढे, सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग काळभोर, प्रशांत जमादार, जगदीश जगताप, डॉ. निलेश चंद्रवंशी उपस्थित होते.

शरद बाराहाते यांचा सोमवारी वाढदिवस होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शेवटच्या टप्प्यात मदतीचे हातही कमी झाले आहेत. अशावेळी बाराहाते यांनी वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळला.

काळभोरनगर मदर तेरेसा होम येथील रुग्णानां फळे, अन्नधान्य वाटप चिंचवड गावातील चापेकर विद्यालय येथील अनाथ विद्यार्थ्यांना अन्नधान्य वाटप आणि मौनीबाबा वृध्दाश्रम येथे नित्योपयोगी वस्तुंचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.