Pune News : पवार-फडणवीस एकाच व्यासपीठावर; फडणवीसांकडून भरभरून कौतुक 

एमपीसी न्यूज –  राजकारणात कट्टर विरोधक असलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आज पुण्यात एकाच व्यासपीठावर समोरासमोर आले होते. एका माध्यम समूहाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांचा उद्योजक म्हणून सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा कार्यक्रमात राजकारणातील प्रसिद्ध उद्योजकांचा सत्कार माझ्या हातून होतोय याचा मला अभिमान वाटतो. अशा प्रकारचं दृश्य फक्त महाराष्ट्रातच दिसू शकतं. पुरस्कारार्थी असलेल्या शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे त्यांचं कर्तृत्व महान असल्याचं म्हणत फडणवीस यांनी या दोघांचेही तोंडभरून कौतुक केले.

फडणवीस आणि पवार खूप दिवसांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यातच फडणवीस यांच्या हस्ते पवारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर फडणवीस यांच्या तोंडून भरभरून कौतूक ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवून दादही दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.