Pune News : सायरस पूनावाला यांना भारतरत्न द्यावा ; शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी

एमपीसी न्यूज – सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोना काळात सायरस पूनावाला यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात यावा, असं शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटल आहे.

कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील लस तयार करुन कोट्यवधी लोकांचा प्राण वाचवले आहेत, त्यामुळे त्यांचा देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान झाला पाहिजे, अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे केली आहे.

पुण्यातील हडपसर भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सीरम इन्स्टिट्यूट कडून पोलिओ, डायरिया, हिपॅटायटीस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती येथे केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लशी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.

170 देशांमध्ये या लशींचा पुरवठा सिरम करते. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार झालाय. कोरोना काळात सीरम इन्स्टिट्यूटकडून देशभरात आणि विदेशातही लसपुरवठा करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.