एमपीसी न्यूज – समर्थ रामदास स्वामी यांनी जिथे समाधी घेतली तो किल्ला सज्जनगड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड हि शिवशाहीची तर सज्जनगड ही अध्यात्मिक राजधानी मानली जात होती.
सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार श्रृंगाकुरी |
नामे सज्जन तो वसविला त्या उर्वशी च्या तिरी ||
साकेता धिपती तथा भगवती हे देव ज्यांचे शिरी|
तेथे श्रीरामदास विलसे जो या जनां उध्दरी||
शिलाहार राजा भोजाने उभारणी केलेल्या या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला ‘आश्वलायनगड’ अशी ओळख होती. या सांस्कृतिक वारसा असलेल्या सज्जनगडाची माहिती करून घेऊया संस्कार भारती, पुणे महानगरच्या शिवदुर्ग मालिकेत