Shivsena Symbol : मोठी बातमी! आता मशाल विरुध्द ढाल-तलवार, अखेर शिंदे गटाला नवीन चिन्ह मिळालं…

एमपीसी न्यूज : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अखेर ढाल-तलवार हे नवं चिन्ह दिलं आहे. काल शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या चिन्हाच्या तीनही पक्ष पर्यायांना बाद करण्यात आले होते. तर त्यांना दुसरे पर्याय देण्यास सांगितले होते. (Shivsena Symbol) त्यासाठी चिन्हांचा पर्याय देण्यासाठी शिंदे गटाला आज सकाळी दहा पर्यंतची वेळ दिली होती. शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे तळपता सुर्य, ढाल तलवार, पिंपळाचं झाड ही तीन चिन्ह देण्यात आली होती.

AFEXCO: अफेक्सोचा सुवर्णमहोत्सवी सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न

निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही गटांना धक्का बसला होता. त्यानंतर दोन्ही गटांना कोणती नावं आणि चिन्ह मिळतात, याबद्दल उत्सुकता होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाने त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय निवडणुक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर शिंदे गटानेही उगवता सूर्य, त्रिशूळ या चिन्हांवर दावा केला त्यासोबतच शिंदे गटाने गदा हे पर्याय देखील दिले होते. मात्र, धार्मिक मुद्द्यावरुन निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची त्रिशुळ आणि गदा ही चिन्ह बाद केली.(Shivsena Symbol) पण उगवता सूर्य या चिन्ह आधीच एका पक्षाचं असल्याने ते कुणालाही दिले नाही. त्यामुळं शिंदे गटाला पुन्हा नवीन चिन्ह सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने काल दिले होते. त्यानुसार त्यांनी इमेलद्वारे तीन चिन्हांचा पर्याय दिला होता. त्यापैकी त्याना ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.