Raviwar Peth : रविवार पेठेत कोसळली दुकानाची भिंत; एक जण जखमी

एमपीसी न्यूज – आज दुपारी रविवार पेठेत (Raviwar Peth) दुकानाची भिंत कोसळली. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. रविवार पेठेत सर्वे नंबर 966 मध्ये हमजेखान चौकजवळ एका बिल्डिंगचे कन्स्ट्रकशनचे काम चालू आहे. बिल्डिंगच्या कन्स्ट्रकशनसाठी मोठ्ठा खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्याला लागून असलेल्या सलूनच्या दुकानाची भिंत दुकानात कोसळली.

Bhosri Crime : फोटोच्या बहाण्याने सोनसाखळी घेऊन चोर पसार

पुणे महानगरपालिकेच्या कसबा पेठ केंद्राचा एक बंब दुपारी 1 वाजता घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखाली (Raviwar Peth) अडकलेल्या लक्ष्मण माळी (वय 50 वर्षे) यांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयाला पाठवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.